राज्यात आज १४,८८८ रुग्णांची वाढ, तर २९५ कोरोना रुग्णांचा मृत्यू
आज राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ झाली आहे.
मुंबई : राज्यात आज कोरोनाचे १४,८८८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर २९५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ७,६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ५,२२,४२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आज ७२.६९ टक्के झालं असून मृत्यूदर ३.२१ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत ३७,९४,०२७ जणांची कोरोना टेस्ट झाली असून त्यातील ७,१८,७११ (१८.९४ टक्के ) जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
सध्या राज्यात १२,६८,९२४ जण होमक्वारंटाईन आहेत. तर ३३,६४४ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात कोरोनाचे १,७२,८७३ रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ७,१८,७११ इतकी झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण ३२९ मृत्यूंपैकी २४१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
राज्यात आतापर्यंत २३०८९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज झालेल्या एकूण मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे २४ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील एका आठवड्यातील आहेत. तर उर्वरिक २६ मृत्यू हे एका आठवड्यापेक्षा अधिकच्या कालावधीमधील आहेत.