Kalyan Crime News: जेलमध्ये कैद असलेल्या कैद्यांकडे एक दोन नाही तर तब्बल 15 मोबाईल सापडले आहेत. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात  हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने जेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर कारागृह प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत तत्कालीन कारागृह अधीक्षक अंकुश सदाफुले यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


नेमकं काय घडलय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मे ते जून महिन्याच्या दरम्यान कैद्यांकडे मोबाईल सापडल्याचा प्रकार घडला होता. सर्च ऑपरेशन मध्ये कैद्यांकडे15 मोबाईल सापडले होते. या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान कारागृह अधीक्षक अंकुश सदाफुले यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच  सदाफुले यांची कल्याणच्या आधारवाडी कारागृहातुन बदली झाल्यावर ते अकोला येथे कार्यरत होते. दरम्यान, माझं प्रमोशन आल्याने जाणूनबुजून ही कारवाई केल्याची प्रतिक्रिया सदाफुले यांनी दिली आहे. 


पुणे आणि नाशिकमधील जेलमध्ये देखील कैंद्याकडे सापडले होते मोबाईल


पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद्याकडे मोबाईल सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तसेच नाशिक कारागृह देखील कैंद्याकडे मोबाईल सापडले होते. कोल्हापुरात देखील कैद्याकडे मोबाईल मिळाला होता. नवी मुंबईतील तळोजा कारागृहात देखील असे अनेक प्रकार घडले आहेत.


जेलमधील कैद्यांपर्यंत मोबाईल पोहचतातच कसे?


राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये कैंद्याकडे मोबाईल सापडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे जेलच्या सुरक्षा व्यवस्थेवरच शंका व्यक्त केली जात आहे. कारागृहाचे कर्मचारीच कैंद्यांना मोबाईल पुरवत असल्याचे देखील तपासात अनेकदा उघड झाले आहे. या प्रकरणी अनेक कर्माचारी तसेच कारागृह अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरीही देखील असे प्रकार सातत्याने घडत आहेत. 


हातांच्या ठशावरुन सापडला चोर


येवला शहरात दिवसा घरफोडी करणा-या अटटल गुन्हेगारास येवला शहर पोलीसांनी छत्रपती संभाजीनगर मधुन बेडया ठोकल्या आहे. येवल्यातील अंगणगाव वसाहतीमध्ये या आरोपीने दरवाजाचे कुलूप तोडत आत प्रवेश करत कपाटातील सोन्या चांदीचा दागिने असा एकूण 61 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत घटनास्थळावर आरोपीचे हाताचे ठसे प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे राहत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.