अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर(Nagpur) पोलिसांनी तब्बल 1500 किलो गांजा हस्तगत(1500 kg ganja seized) केला आहे. सेंद्रिय खतांनी(organic fertilizer truck) भरलेल्या एका ट्रक मधून छुप्या पद्धतीने या गांजाची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी नागपूरच्या सीमेवरच हा ट्रक पकडला. या गांजाचे मोजमाप करण्यासाठी पोलिसांना वजन काटा मागवावा लागला. 2 कोटी 43 लाख 96 हजारापेक्षा जास्त मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. आज पहाटे नागपूरच्या कापसी परिसरात पोलिसांनी विशेष मोहिम राबवत छुप्या पद्धतीने होणाऱ्या या गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी ट्रक चालक सोमेश्वर राव उर्फ बुज्जी कोटीपीलम (वय 50) आणि बलेमनानाजी उर्फ नानी बलेमा(वय 25) या दोन आरोपींना अटक केली आहे. दोघेही राहणारे राजमंडरी आंध्र प्रदेश येथील राहणारे आहेत.


ओडिशा मधून सेंद्रिय खत घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये सेंद्रिय खताच्या शेकडो पोत्यांच्या मध्ये गांजाची जवळपास 50 पोते लपवून ठेवण्यात आले होती. पोलिसांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष प्रशिक्षित केनाईन डॉग च्या मदतीने या ट्रकची तपासणी केली आणि त्यामध्ये एक हजार किलो पेक्षा जास्त गांजा सापडला आहे.


याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या माहितीवर बीडमध्ये ही दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकमध्ये लादलेले सेंद्रिय खत शिर्डीला पाठवण्यात येत होते. त्यामुळे शिर्डीमध्येही यासंदर्भात पोलीस तपास करणार आहेत. दरम्यान संपूर्ण 1500 किलो गांजा निश्चितच बीडमध्ये वापरला जाणार नव्हता. तर, तो तिथून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवला जाणार होता का? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.  नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी ऑपेशन नार्को फ्लश आउट मोहिमेत अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.