मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या ७१ लाखांच्या पुढे गेली आहे. तर राज्यात १५ लाख ३५ हजार ३१५ वर पोहचली आहे. मात्र आज राज्यातील दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात आज ७ हजार ८९ नवे करोनाबाधित आढळले असून, १५ हजार ६५६ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ८३.४९ वर पोहोचला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १५ लाख ३५ हजार ३१५ वर पोहचली आहे. त्यापैकी २ लाख १२ हजार ४३९ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १२ लाख ८१ हजार ८९६ रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. 


गेल्या २४ तासांत १६५ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात ४० हजार ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.