कल्याण : कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाचे सर्वाधिक १८ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या २१३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ६८ रुग्ण बरे झाले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-पश्चिम मधील ३, कल्याण पूर्व मध्ये३, डोंबिवली पूर्व मध्ये ५, डोंबिवली पश्चिम मध्ये २, टिटवाळा येथे ५ रुग्ण आढळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण- डोंबिवलीत रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. महापालिकेनं १० हॉटस्पॉट जाहीर केले आहेत. तर १२२ पैकी २० प्रभाग संवेदनशील म्हणून जाहीर केले आहेत.


केडीएमसीतील हॉट स्पॉट


- डोंबिवली पूर्व - म्हात्रे नगर, आयरे गाव, तुकाराम नगर, छेडा रोड


- डोंबिवली पश्चिम - रेतीबंदर रोड, टेल्कोस वाडी


- कल्याण पूर्व - चिंचपाडा, भगवान नगर


- कल्याण पश्चिम - खडकपाडा, वायले नगर


२० संवेदनशील प्रभाग?


प्रभाग क्र. 3 - गांधारे


प्रभाग क्र. 10 - टिटवाळा गणेश मंदिर


प्रभाग क्र. 15 - शहाड


प्रभाग क्र. 23 - फ्लॉवर व्हॅली


प्रभाग क्र. 27 - चिकणघर गावठाण


प्रभाग क्र. 50 - गरिबाचा वाडा


प्रभाग क्र. 54 - ठाकूर वाडी


प्रभाग क्र. 56 - गावदेवी मंदिर नवागाव


प्रभाग क्र. 63 - कोपर रोड


प्रभाग क्र. 64 - जुनी डोंबिवली


प्रभाग क्र. 65 - कोपर गाव


प्रभाग क्र.67 - म्हात्रे नगर


प्रभाग क्र. 71 - सारस्वत कॉलनी


प्रभाग क्र. 78 - तुकाराम नगर


प्रभाग क्र. 82 - अंबिका नगर


प्रभाग क्र. 95 - नेहरू नगर


प्रभाग क्र. 96 - जाईबाई विद्यामंदिर साईनगर


प्रभाग क्र. 98 - विजय नगर


प्रभाग क्र. 100 - तिसगाव गावठाण


प्रभाग क्र. 111 - सागांव सोनारपाडा