मुंबई : लांबसडक केस म्हणजे प्रत्येक मुलीचं प्रेम... आपल्या केसाची निगा राखण्यासाठी मुली वेगवेगळे पर्याय वापरतात. मात्र असं असताना औरंगाबादच्या एका विद्यार्थीनीने आपले केसच दान केले आहेत. 19 वर्षीय किरण गितेने  कँन्सरग्रस्तांना केस दान केले आहेत. पाहूयात किरण गिते नावाच्या या धाडसी तरूणीची ही गोष्ट....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लांबसडक केस हे महिलांसाठी जणू दागिना असतो. महिलांचं त्यांच्या केसांवर खूपच प्रेम असतं. पण सामाजिक बांधिलकीतून किरण गिते नावाच्या तरुणीनं आपल्या लांबसडक केसांचा त्याग केलाय. कॅन्सर झालेल्या महिलांचे केमोथेरेपीमुळे केस गळतात. डोक्यावर टक्कल पडल्यानं महिलांच्या सामाजिक जीवनात वावरण्यावर मर्यादा येतात. किरणनं दान केलेले केसातून अशा महिलांसाठी विग तयार करण्यात येणार आहेत.



किरणच्या या कल्पनेला तिच्या घरच्यांनी आणि कॉलेजमधील प्राध्यापकांनीही पाठिंबा दिला आहे. 19 व्या वर्षी तिने उचलेलं हे पाऊल कौतुकास्पदच आहे. चांगल दिसणं, आकर्षक वाटणं यासाठी विशीतली तरुणाई काहीही करायला तयार असते. पण कुणाच्या तरी चेहऱ्यावरचं हसू परत येण्यासाठी केशसांभारासारखा दागिना देण्याचं दातृ्त्व किरणनं दाखवलंय हे कौतुकास्पद आहे.



'मदत' या संस्थेची किरण गिते औरंगाबादची स्वयंसेवक झाली आहे. औरंगाबादमध्ये यासंदर्भात कुणाला काही मदत लागल्यास ते किरणशी संपर्क साधू शकतात.