औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हातील चिंचोली तांडा येथे एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मृत तरुणाचे नाव रवींद्र कल्याण जाधव ( वय १९ ) असे आहे. या विरोधात चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. परंतु, हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी रात्री रवींद्र घरात टीव्ही पाहत बसला होता. साडेनऊच्या सुमारास आरोपी रामेश्वर शिवलाल पवार त्या ठिकाणी आला. काम आहे असे सांगून त्याने रवींद्रला घरातून बाहेर नेले व धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. हत्येनंतर रवींद्रचा मृतदेह जवळच्या शेतात फेकून पसार झाला.


या प्रकरणी आरोपी विरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्या कारणावरून रवींद्रची हत्या करण्यात आली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.