COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे : शहराला हादरून सोडणाऱ्या रावसाहेब पाटील आणि त्याचा मुलगा वैभव पाटील या दुहेरी हत्याकंड प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. बाजीराव पवार आणि मुख्य हल्लेखोर जयराज पाटील याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुर्ववैमनस्यातून हे हंत्याकांड झाले असून पाटील आणि पवार कुटूंबात खुप आधीपासुन वाद होते अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मयत रावसाहेब पाटील आणि संशयीत बाजीराव पवार हे पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे खंबीर समर्थक होते.


आता दोन्ह्यींच्या वाटा मात्र शत्रुत्वाकडे वळल्या होत्या. या हत्याकांडातील प्रमुख संशयीत जयराजला पारोळा पोलीसांनी पकडून देत धुळे पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. या हत्याकांडातील मयत वैभवचे नुकतेच लग्न झाले होते. कालही मयत पाटील आणि संशयीत जयराज यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेतील अन्य संशयीतांचा शोध विशेष पोलीस पथक घेत असुन जयराजच्या घरातुन दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे संपुर्ण शहर दहशतीत असून गुड्या खून प्रकरणानंतर हे दुसरे अमानुष हत्याकांड घडले आहे. पोलीसांनी छोट्या मोठ्या गुंडाचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा सर्वसामान्याकडून व्यक्त होत आहे.