अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  समृद्धी महामार्ग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे. कधी उद्घाटनाचा वाद तर कधी कोसळून पडलेले पूल यामुळे समृद्धी महामार्ग अनेकदा चर्चेत आला आहे. त्यामुळेच महामार्गाचे उद्धाटनही पुढे ढकल्याला ज्यात आहे. अनेकांना समृद्धी महामार्गावर सैर करण्याचा मोह सुटता सुटत नाही. त्यामुळे अनेकजण उदघाटनाआधीच सैर करून आले आहेत. (2 deers raceing on samruddhi highway at amravati video viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील असेगाव ते वर्धा दरम्यान उद्घाटनाआधीच दोन हरणांनी समृद्धी महामार्गावर पैज लावल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावर दोन हरीण धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. 'समृद्धी' वर जणूकाही हरणांची रेस लागली आहे, असा हा व्हीडीओ आहे. महामार्गावर जंगली प्राणी येऊ नये, यासाठी दुतर्फा 15 फूट उंच संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तरीही हे दोन हरीण महामार्गावर आले कसे? असा सवाल उपस्थित होतोय. तसेच समृद्धी महामार्गावरुन होणाऱ्या प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.