Amravati News Today:  जनगणनेचे काम करण्यासाठी आलो आहोत अशा भुलथापा देत नायब तहसीलदारांच्या पत्नीसा चाकुचा धाक दाखवून लुटले आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात तरुणांनी चाकुचा धाक दाखवत पाच लाखांची लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती शहरातील राठी नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी घरात एकट्याच असताना जनगणनेच काम करायला आल्याचे भासवत दोन अज्ञात तरुणांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून पाच लाखांची लूट केल्याची धक्कादायक घटना दिवसाढवळ्या घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


आधार कार्ड दाखवण्यास सांगितले अन्... 


काल दुपारी प्रशांत अडसूळ यांच्या पत्नी घरी एकट्याच असताना दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून घरी आले. त्यांनी आम्ही जनगणनेच काम करायला आलो आहोत, असं सांगीतले. महिला विश्वास बसावा यासाठी त्यांनी तिला आधार कार्ड दाखवण्यास सांगितले. आधार कार्ड आणण्यासाठी ती घरात जाताच तिला चाकूचा धाक दाखवून घरात बांधून ठेवले व घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण पाच लाखांचा ऐवज या चोरट्यांनी दिवसाढवळ्या लुटून नेला. 


सीसीटीव्ही फुटेज सापडले पण तेव्ही व्यर्थ


महिलेच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक देखील रवाना केलेले आहे. घरात येताना हे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मात्र तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळं या चोरट्यांना शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सर्व्हे करायला कोणीही अशा प्रकारे आल्यास घराच्या आत घेऊ नये किंवा बाहेरूनच माहिती द्यावी, असे आवाहन गाडगे नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी केले आहे. मात्र, नायब तहसीलदार यांच्या घरातच अशा पद्धतीची घटना घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे. इतर नागरिकांनीही घरात कोणालाही घेताना काळजी घ्यावी  असं अवाहन करण्यात येत आहे.