सांगली :  एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने पैसे चोरणा-या दोघा चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अकाऊंटमधून पैसे चोरताना दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. दोघांनी आतापर्यंत जवळपास अशा प्रकारे ४० लोकांना लुटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाश उत्तम वैराट आणि राज अंजनी बानोले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. एटीएममधून पैसे काढताना समस्या येणा-या लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचा पिन नंबर चोरून त्यांच्या अकाऊंटमधील सर्व रक्कम चोरून घेत असत. 


शहरातल्या विविध एटीएममध्ये त्यांनी आतापर्यंत ४० पेक्षा जास्त लोकांना फसवले आहे. लोकांच्या एटीएमचा पासवर्ड शिताफीने चोरून रक्कम काढल्यानंतर कँसलचा ऑप्शन दाबण्यास विसरले की पुन्हा हाच पिन टाकून लोकांच्या खात्यातून रक्कम चोरून घेत असत. 


मुख्यत्वे करून जेथे एकापेक्षा अधिक एटीएम आहे तेथे हे दोघेही गर्दीचा फायदा उचलत असत. त्यांनी केलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस अधिक तपास करीत असून नागरिकांनी अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.