मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळ
लोकल ट्रेनमध्ये 20 लाखांची कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ही कॅश सापडली आहे.
Mumbai Crime News : लोकलही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. मध्य रेल्वे मार्गावर एक विचित्र घटना घडली आहे. आसनगाव लोकलमध्ये 20 लाख रुपयांची कॅश सापडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी ही रोकड हस्तगत केली आहे.
आसनगाव स्थानकातून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक बेवारस बॅग आढळली. या प्रवाशाने कल्याण रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ या बॅगेची तपासणी केली असता त्यात 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले. या बॅगेत जवळपास 20 लाखांची रोकड असल्याचे पोलिसांना आढळून आलं.
हे देखील वाचा... लोणावळामध्ये साताऱ्याच्या कास पठारचा फिल! 7 वर्षातून एकदा फुलणाऱ्या कारवी फुलांचा बहर
दरम्यान ही बॅग कोणाची आहे याबाबत कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहितीच्या मदतीने या बॅगेच्या मालकाचा शोध सुरू केला आहे. ही रोकड कोण, कुठे आणि कशासाठी घेऊन चालला होता याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
लोकलमधून प्रवास करताना महिलांना असुरक्षित वाटत असल्याचा धक्कादायक अहवाल
पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करताना महिलांना असुरक्षित वाटत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. मुंबई रेल्वे विकास महामंडळानं केलेल्या सर्व्हेत पश्चिम रेल्वेच्या ४६ टक्के महिलांना छेडछाडीचा सामना करावा लागलाय. पालघर रेल्वे स्टेशन हे सर्वात असुरक्षित स्टेशन असल्याचं मत महिलांनी नोंदवलवंय. महिलांच्य़ा डब्यात पुरुष प्रवासी घुसखोरी करत असल्याच्या तक्रारी जवळपास ८५ टक्के महिलांनी नोंदवल्यात. अनेक महिला हेल्पलाईनकडे तक्रारच करत नसल्याचंही या सर्व्हेतून समोर आलंय.