झी 24 तासवर सर्वात आधी पाहा बारावीचा निकाल
एका क्लिकवर निकालाची महत्त्वाची बातमी...
मुंबई : वर्षभराचा अभ्यास, कोरोनाचं संकट, त्यातून बदललेलं महाविद्यालयीन वेळापत्रक या साऱ्यातून तरुन जाणाऱ्या आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. आज (बुधवार) इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. (2022 hsc result date time website topper commerce science arts)
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. याच परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व विभागांतील दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल येत्या काही दिवसात जाहीर होतील अशी माहिती दिली. त्यानुसार आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आली.
निकालाची वेळ आणि तो कुठे पाहता येणार यासंबंधीची माहिती
आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर आणि आईचं नाव टाकणं आवश्यक असणार आहे. सीट नंबर चुकला तर आईच्या नावाने निकाल पाहता येणार आहे.