मोठी बातमी! बारावीचा निकाल जाहीर, झी 24 तासवर सर्वात आधी पाहा Result
विद्यार्थ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी
मुंबई : वर्षभराचा अभ्यास, कोरोनाचं संकट, त्यातून बदललेलं महाविद्यालयीन वेळापत्रक या साऱ्यातून तरुन जाणाऱ्या आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावी परीक्षांचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. (2022 hsc result revealed date time website topper commerce science arts )
राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्यातील बारावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर केली.
राज्यातील 12 वीच्या विद्यार्थ्यांचा यंदाचा निकाल 94.22 टक्के इतका लागला. यामध्ये कोकण विभागानं बाजी मारली. कोकणात तब्बल 97.21 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला.
मुंबई विभागातून 90.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या वर्षीही विद्यार्थीनींनी या परीक्षेत बाजी मारली. मुलींचा निकाल 35.35 टक्के इतका लागला. तर, 93.29 टक्के मुलं बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. मुलांच्या तुलनेत यंदा मुलींचा निकाल 2.06 टक्क्यांनी जास्त लागला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. बरेच चढ-उतार असतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षेचा हा टप्पा मोठ्या संयमानं ओलांडला याबाबत शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं.
कुठे पाहता येणार निकाल
हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर आणि आईचं नाव टाकणं आवश्यक असणार आहे. सीट नंबर चुकला तर आईच्या नावाने निकाल पाहता येणार आहे.
बारावीच्या परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 230769 इतकी आहे.
प्रथम श्रेणी 60 टक्क्यांपेक्षा जास्त - 558687
द्वितीय श्रेणी 45 टक्क्यांपेक्षा जास्त- 493442
उत्तीर्ण श्रेणी 35 टक्के आणि पुढे- 73715
यंदाच्या वर्षी HSC परीक्षेसाठी एकूण 1449664 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. यापैकी 1439731 जण प्रविष्ट झाले आणि त्यातूनही 1356604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाखानिहाय निकाल
विज्ञान - 98.30
कला- 90.51
वाणिज्य- 91.71
व्यवसाय अभ्यासक्रम - 92.40
आय टी आय - 66.41