भंडारा : भंडारा जिल्याच्या लाखांदूर तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तब्बल २२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतलाय. यात अनेक महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत.


सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या पिसाळलेल्या कुत्र्याला ग्रामस्थांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. 


अखेर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी भंडारा नगर परिषदेच्या पशू वैद्यकीय विभागाकडे तक्रार करून पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्याची मागणी केलीय.


त्यानंतर नगर परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागानं पिसाळलेल्या कुत्र्याचा कसून शोध सुरू केलाय. मात्र, या परिसरातल्या ग्रामस्थांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची कमालीची दहशत पसरलीय.