मुंबई : मीरारोड भागात एका महिलेच्या पोटातून तब्बल 2350 स्टोन्स काढण्यात आले. 50 वर्षीय मिथीलेश शर्मा या महिलेच्या पित्ताशयात तब्बल 2350 स्टोन्स होते. स्टोन्सची एवढी प्रचंड संख्या पाहून डॉक्टरही हैराण झाले. सर्जरीनंतर या महिलेची प्रकृती सुधारत आहे. मीरारोडच्या भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही महिला पोटदुखीमुळे आजारी होते. 


सुरूवातीला प्राथमिक उपचार पण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांनी सुरूवातीला प्राथमिक उपचार केले. मात्र पोटदुखी वाढतच होती. अखेर पोटदुखी असह्य झाल्यामुळे अखेर तिला भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं. 


तपासणीनंतर गॉल ब्लॅडरमध्ये खडे


अल्ट्रासाऊंड तपासणीनंतर गॉल ब्लॅडरमध्ये खडे असल्याचं उघड झालं. डॉ. बी. सी. शाह यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही कठीण शस्त्रक्रिया पार पाडली. लेप्रोस्कोपीक पद्धतीने हे ऑपरेशन पार पडलं.