अलिबाग : एलिफंटा बेटावर आता २४ तास वीज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


घारापुरी बेटावर वीजपुरवठा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एलिफंटा अर्थात घारापुरी बेटावर वीजपुरवठा करण्यात आलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलिफंटा बेटावरील प्रातिनिधीक पाच रहिवाशांना वीज मीटर जोडणीचं प्रमाणपत्र दिलंय. या निमित्त जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यासाठी भाजपनं जोरदार बॅनरबाजी केली.


श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न


कायमस्वरूपी वीजेची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करत ते प्रत्यक्षात आणल्याचे पुरेपूर श्रेय भाजपने यावेळी घेतले. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही याबाबत प्रयत्न केले असल्याने ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यानिमिताने धर्माधिकारी यांचा भक्तसंप्रदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. 


 नितीन गडकरी यांना श्रेय


एलिफंटावर वीज सुविधा देण्याचा निर्णय घेतांना धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या नितीन गडकरीचा कसा प्रभाव पडला याचा किस्साच यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला. तर एलिफंटावर उपलब्ध झालेली वीज कधीही खंडीत होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.