वर्धा : वर्ध्यातील भुगावातल्या उत्तम गलवा कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. वर्ध्याच्या भुगाव येथील ही घटना आहे. या स्फोटात २५ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकरांसोबत कंपनी प्रशासनाची मुजोरी. फरनेसमध्ये स्फोट झाल्याची माहिती घटनास्थळी मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मजुरांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कंपनी व्यवस्थापनाची माध्यमांसोबत मुजोरी बघायला मिळाली. वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्यांना रोखण्यात आले आहेत. स्फोटात जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.  30 ते 40 टक्के जाळण्याची प्रमाण समोर आली आहे.  कंपनी प्रशासनाकडून घटना दाबण्याचा प्रयत्न होत असल्याच समोर आलं आहे.