सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : पुणे (Pune) शहरात सोमवारी मध्यरात्री खुनाचा (Murder) थरार पाहायला मिळाला. एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या हत्येने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणाचा मध्यरात्री चाकूने भोसकून आणि डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून निर्घृण खून करण्यात आला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाना पेठेतील नवा वाडा येथे साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. 


अक्षय लक्ष्मण व्हलाळ (28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येनंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  मध्यवस्थीमध्ये खुनाचा थरार घडल्याने खळबळ उडाली आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


पुणे शहराच्या मध्यावस्तीत घडलेल्या या हत्याकांडामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांनी आता तपास सुरु केला असून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. तसेच कोणत्या कारणांमुळे अक्षयची हत्या झाली याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे.