ठाण्यात पार पडली २८ वी महापौर वर्षा मॅरेथॉन
ठाण्यात आज २८ वी महापौर वर्षा मॅरेथॉन पार पडली. पालिकेच्या मुख्यालय चौकातून या स्पर्धेला सुरुवात झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.
ठाणे : ठाण्यात आज २८ वी महापौर वर्षा मॅरेथॉन पार पडली. पालिकेच्या मुख्यालय चौकातून या स्पर्धेला सुरुवात झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.
जवळपास 20 हजार धावपट्टूंनी यामध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत सर्वसामान्य ठाणेकर, ज्येष्ठ नागरिक, महिला, बच्चेकंपनी, परदेशी पर्यटक आणि सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. 21 किमीच्या मॅरेथॉनमध्ये पुणे आर्मीच्या रणजित सिंग यानं या मॅरेथॉनमध्ये बाजी मारली आहे. तर नाशिकचा पिंटू यादव दुसरा तर अलिबागचा सुजीत गमरे तिसरा आला आहे.