इगतपुरी : इगतपुरीजवळ १२८०९ डाऊन मुंबई - हावडा मेलचे तीन डबे रुळावरून घसरलें. या अपघातामुळे मुबंई-दिल्लीसह उत्तर भारतात जाणारी आणि येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातामुळे पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्यात तर काही गाड्या वेगवेळ्या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्यात. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.


मनमाड येथून साहित्य आणि कामगारांना घेऊन ब्रेक डाऊन ही विशेष गाडी इगतपुरीकडे रवाना झालीये. लवकरात लवकर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न रेल्वे  प्रशासनाकडून सुरु आहेत.