बारामती : लॉकडाऊनचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली आहे. बारामती न्यायालयाने हा निकाल दिला आहे. विनाकारण मोटारसाईकलवर फिरणे आणि दुकाने उघडल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तीन आरोपींना प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लॉकडाऊनचं पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना राज्यातील विविध भागात पोहोचला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन असतानाही अनेक जण याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. काही ठिकाणी पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाईला सुरुवात केली आहे.


कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचं पालन होणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी घरीच बसणं हाच एक उपाय आहे. काही जण मात्र याला कानाडोळा करत आहेत. बाईकवरुन मोकाटपणे फिरणाऱ्यांचं प्रमाण ही जास्त आहे. काम नसताना देखील घोळका करुन बाहेर पडणाऱ्यांचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे.