अहमदनगर : अहमदनगरमध्ये महापालिकेच्या निकालात झी २४ तासनं वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. नगर मनपामध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. पण भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यास युतीची सत्ता स्थापन होणे सहज शक्य नाही. आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीला २१ तर काँग्रेसला ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपला १८ जागा तर शिवसेनेला १७ जागा मिळत आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करायची असेल, तर शिवसेना आणि भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.


सत्ता स्थापनेसाठीचे पर्याय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) अहमदनगरमध्ये सत्ता स्थापण्यासाठी पहिला पर्याय भाजप आणि शिवसेनेच्या य़ुतीचा आहे...शिवसेना-भाजप एकत्र आल्यास स्पष्ट बहुमताचा ३५ आकडा गाठणं शक्य आहे. 


२) दुसरा पर्याय आघाडीचा असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येवूनही बहुमताचा आकडा गाठणं कठीण दिसतंय. इतरांना एकत्र आणलं तरी ३५ चा आकडा गाठणं शक्य दिसत नाही. 


३) भाजप-शिवसेनेची युती झाली नाही तर राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्यास सत्तेचा पर्याय खुला होऊ शकतो.


४) राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सूर जुळले तर सत्तेचा तिसरा पर्याय खुला होऊ शकतो.