धुळे : उसनवारी दिलेले पैसे वारंवार मागतो म्हणून धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील नंदकिशोर पाटील या इसमाला पेट्रोल टाकून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नंदकिशोर यांनी घनश्याम गुजर याला एक लाख रुपये उसनवारी दिले होते. नंदकिशोर हे घनश्यामकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. मात्र तो ते पैसे देत नव्हता. अखेर संतप्त घनश्यामनं आपल्या दोन साथीदारांना सोबत घेत नंदकिशोर यांना पेट्रोल टाकत जिवंत जाळलं. 


या घटनेनंतर सोनगीर गावात एकच खळबळ माजली. उपचारादरम्यान नंदकिशोर यांचा मृत्यू झाला असून सोनगीर पोलिसांनी घनश्याम सह मंगेश आणि मख्खन गुजर या तिघांना अटक केली आहे. या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात रोष व्यक्त केला.