महाबळेश्वरमध्ये साचला ३ टन कचरा
महाबळेश्वरमध्ये कचऱ्याच साम्राज्य पसरलं होतं.
महाबळेश्वर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरला लाखो पर्यटकांनी पसंती दिली. पण त्य़ानंतर महाबळेश्वरमध्ये कचऱ्याच साम्राज्य पसरलं होतं.
३ टन कचरा
हा संपूर्ण कचरा साफ करायला नगरपालिका कर्मचा-यांना रात्री १ ते पहाटे पाचपर्यंत मेहनत घ्यावी लागली. तब्बल ३ टन कचरा इथून काढण्यात आला.
पारा ६ अंशावर
वेण्णा लेक इथे ६ अंशावर पारा घसरलेला असतानाही अशा कडाक्याच्या थंडीतही सफाई कर्मचारी काम करत होते.
पर्यटकांनी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात केलेल्या पार्ट्या दारुच्या बाटल्यांचा खच पहायला मिळाला.
पण पालिकेच्या कर्मचा-यांनी तीन ते चार तासांत हा सगळा कचरा साफ करून नववर्षाचं स्वागत स साफसफाई करत आणि स्वच्छतेचा संदेश देत केलंय.
पर्यटकांना नाही भान
इथे आलेल्या पर्यटकांनीच जर भान राखलं असतं आणि अस्वच्छता केली नसती तर कडाक्याच्या थंडीत या कर्मचाऱ्यांनाही काम करावं लागलं नसतं.