बुलडाणा : बुलडाण्याच्या इकबाल नगर परिसरात भरधाव वेगानं येणाऱ्या अपे ऑटोनं धड़क दिल्यामुळे एका तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. मोहम्मद अबुझर असं या मुलाचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेमुळे मिर्झा नगर परिसरात तणावाचे वातावरण होतं. अबुझर एका दुकानातून काही वस्तु आणण्यासाठी गेला होता. त्याच वेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही अॅपे ऑटो त्याच्यावर येऊन धडकली. यात अबुझरचा जागीच मृत्यू झाला. 


मुलाच्या काकानं केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अॅपे ऑटोच्या चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय. यावेळी पोलिस स्टेशन परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.