वसई: समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या ३ तरुणांचा पाण्यात बुड़ून मृत्यु झाला आहे. वसईच्या भूईगाव बीच समुद्र किनाऱ्यावर ही दुर्घटना घडली. हे तिघेही नालासोपाऱ्यात राहणारे आहेत. अभिनव शिंदे, राहुल राठोड, रितेश घेगडमाळ अशी या तीन तरुणांची नावं आहेत. हे तिघेही समुद्रात गेले, त्यावेळी भरती सुरू होती. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं ते वाहून गेले, आणि त्यांचा मृत्यू झाला...


अर्नाळ्यात ५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विरारच्या अर्नाळा बीच वरच्या निसर्ग रिसॉर्ट मध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीचा  बुडून मृत्यू झालाय.. प्राप्ती नरेश पाटील असं या चिमुकलीचं नाव आहे... ती नारंगी या गावाची रहिवासी आहे. शनिवारी ती आपल्या कुटुंबा सोबत रिसॉर्टमध्ये गेली होती. पोहत असतांना तिचा बुडून मृत्य झाला आहे.  प्राप्तीच्या जाण्यानं पाटील कुटुंबीयांवर दुःखा च डोंगर कोसळलाय... याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीये..


आरेवारे समुद्रात ५ जणांचा बुडून मृत्यू  


समुद्राच्या खोलीबाबत माहिती नसतानाही पाण्यात शिरणं किती धोकादायक ठरु शकतं, याचंच उदाहरण रत्नागिरीत पाहायला मिळालंय.  रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे समुद्रात ५ जणांचा बुडून मृत्यू झालाय. तर एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. मुंबईतल्या बोरिवली पश्चिम इथल्या होली क्रॉस रोडवरच्या कॉलनीत राहणाऱ्या डिसूझा कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळलाय. पर्यटनासाठी गणपतीपुळे इथे डिसूझा कुटुंब  जात होतं. त्याआधी त्यांनी रत्नागिरीतल्या आरेवारे समुद्र किनाऱ्यावर पोहायचा आनंद घेण्याचं ठरवलं. स्थानिकांनी त्यांना असं करण्यापासून रोखलंही. कारण ज्या भागत हे कुटुंब पोहोण्यासाठी उतरत होतं तिथे पाणी अधिक खोल होतं. मात्र डिसूझा कुटुंब स्थानिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत पाण्यात उतरलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.