Maharashtra Corona : औरंगाबादेत नव्या स्ट्रेनची दहशत...24 तासांत जातोय रुग्णाचा जीव
औरंगाबादेत कोरोनाचा (Aurangabad Corona) हाहाकार सुरु आहे. रुग्णांची संख्या वाढत असतांना मृत्यूची (Aurangabad corona death)
मुंबई : औरंगाबादेत कोरोनाचा (Aurangabad Corona) हाहाकार सुरु आहे. रुग्णांची संख्या वाढत असतांना मृत्यूची (Aurangabad corona death) संख्याही वाढत चालली आहे. दिवसाला 1500 वर रुग्ण आढळून येत आहेत. तर सरासरी 40 रूग्णांचा मृत्यू होत असल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. धक्कादायक म्हणजे यातील काही रुग्ण तर दाखल केल्यानंतर अवघ्या 12 ते 24 तासांमध्येच दगावले आहे. त्यामुळे हा कुठला नवा स्ट्रेन तर नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.
औरंगाबादमधील कोरोना स्थिती :
1. औरंगाबादमध्ये 1 ते 10 मार्च दरम्यान 4 हजार 73 रुग्ण आढळले, त्यातील 43 जणांचा मृत्यू झाला आहे.
2. 11 ते 20 मार्च पर्यंत 11 हजार 383 रुग्ण आढळले असून यातील 97 जणांचा मृत्यू झाला आहे.
3. 21 ते 31 मार्च दरम्यान 20 हजार 17 रुग्ण आढळले यातील तब्बल 300 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
4. म्हणजेच अवघ्या महिन्याभरात औरंगाबादमध्ये 440 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
5. धक्कादायक बाब म्हणजे मोठ्यांसोबत लहान मुलांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 4 बालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही चारही मुलं ग्रामीण भागातील होती. त्यांना उशिराने उपचारासाठी आणल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी आता लहान मुलं देखील कोरोनाला बळी पडू लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.
कोरोनाचे वाढते रूग्ण आणि मृत्यूची संख्या दोन्ही चिंताजनक आहे. त्यामुळे लक्षणे आढळल्यास अंगावर काढणे योग्य नाही. त्यात ज्येष्ठांची आणि चिमुकल्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हा कोरोनाचा नवा स्ट्रेन असेल तर तो खूपच घातक ठरू शकतो.