33 ट्रेन रद्द, 19 ट्रेनच्या मार्गात बदल; जळगाव-मनमाड तिसरी लाईन टाकण्यासाठी रेल्वेचा मोठा मेगा ब्लॉक
जळगाव-मनमाड दरम्यान तिसरी लाइन आणि यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी 14 आणि 15 ऑगस्टला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणा-या 33 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात.
Manmad-Jalgaon Mega Block : जळगाव-मनमाड दरम्यान तिसरी लाइन आणि यार्ड रिमॉडेलिंगचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 14 आणि 15 ऑगस्टला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणा-या 33 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर 19 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत.
जळगाव-मनमाड दरम्यान तिसरी लाइन आणि यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने 14 आणि 15 ऑगस्टला हा मेगा ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या अप डाऊन - मार्गावरील 33 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, 16 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने रद्द झालेल्या वाहनांची यांदी जाहीर करताना प्रवाशांना होत असलेल्या गैरसोईबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. दरम्यान, दुसरा शनिवार, रविवार, सोमवारची एक दिवसाची सुटी टाकून मंगळवार आणि बुधवारपर्यंत असे सलग 5 दिवस सुटी आली आहे. यामुळे रेल्वेने हे काम हाती घेतले आहे.
प्रवास जलद होणार
या तिसऱ्या रेल्वे मार्गामुळे मुंबईकडील वाहतूक सुरळीत होईल. गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे अनेकवेळा रेल्वे मार्ग व्यस्त असल्याने रेल्वे गाड्यांचा खोळंबा होतो. सिग्नल न मिळाल्याने अनेक रेल्वे खोळंबून राहतात. परिणामी प्रवासाचे वेळापत्रक बिघडते. प्रामुख्याने जळगाव-भुसावळ दरम्यान ही अडचण येते. तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गामुळे ही अडचण सुटून जिल्ह्यातील प्रवाशांचा मुंबई व सुरतकडील प्रवास गतिमान होईल.
महाराष्ट्रातील या एक्सप्रेस रद्द
अप मार्गावरील रद्द गाड्यांमध्ये महाराष्ट्रातील भुसावळ- देवळाली एक्स्प्रेस 13 आणि 14 ऑगस्टला धावणार नाही. सोबतच साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. नांदेड-मुंबई एक्स्प्रेस 13 ऑगस्टला धावणार नाही. भुसावळ- इगतपुरी 14 ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे. नागपूर-पुणे एक्स्प्रेस 13 ऑगस्टला धावणार नाही. रिवा-पनवेल एक्स्प्रेस 14 ऑगस्टला रद्द करण्यात आलेय. नागपूर-पुणे एक्स्प्रेस 14 ऑगस्टला धवणार नाही. मुंबई-नांदेड एक्स्प्रेस 14 आणि 15 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेय. गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस 14 आणि 16 ऑगस्टला रद्द करण्यात आलेय, नांदेड-एलटीटी १४ला आणि नांदेड-मुंबई एक्स्प्रेस १३ ऑगस्ट रद्द केली आहे..
महाराष्ट्राबाहेर धावणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
जालना-मुंबई एक्स्प्रेस 14 आणि 15 ऑगस्टला रद्द करण्यात आलेय. जबलपूर-पुणे एक्स्प्रेस 16 ऑगस्टला धावणार नाही. बलिया-दादर एक्स्प्रेस 13 आणि 16 ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस 13 आणि 14 ऑगस्टला धावणार नाही. आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस 14 आणि 15 ऑगस्टला रद्द करण्यात आलेय. सिकंदराबाद-मुंबई एक्सप्रेस 13 आणि 14 ऑगस्ट रोजी धावणार नाही.