मुंबई : राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत जाहीर झाली आहे. त्याआधी २७ महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाची सोडत जाहीर होती. आता जिल्हा परिषदेची सोडत जाहीर झाल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप युती तुटल्याने अनेक ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत चूरस निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागात जिल्ह्या परिषदेत सत्ता कोण राखतो याची उत्सुकता आहे. त्यामुळे नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणानुसार काही ठिकाणी जिल्हा परिषदेत वेगळी समिकरणे पाहायला मिळणार आहेत.


- ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड : नागरिकांचा मागास प्रवर्ग - ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (महिला) 


- रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा : खुला (सर्वसाधारण) 


- जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर  : खुला (महिला)


- सोलापूर, जालना : अनुसूचित जाती (सर्वसाधारण)  


- नागपूर, उस्मानाबाद : अनुसूचित जाती (महिला) 


- नंदुरबार, हिंगोली : अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)


- पालघर, रायगड, नांदेड : अनुसूचित जमाती (महिला)  


- लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (सर्वसाधारण)