पुण्याची आवाज करणाऱ्या मंडळांना नोटीसा....
गेल्या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत ध्वनिप्रदूषण केल्या प्रकरणी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
पुणे : गेल्या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत ध्वनिप्रदूषण केल्या प्रकरणी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
पोलिसांनी नोंदवलेल्या निरक्षणानुसार या मंडळांसमोरिल वाद्यांचा आवाज ९० ते १०५ डेसिबल पर्यंत गेल्याचं समोर आलय..
त्याबाबतचा अहवाल संबंधित पोलिस ठाण्यांकडून प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय..
तर यंदाचा गणेशोत्सव तोंडावर असताना गेल्या वर्षीच्या मिरवणूकीसंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्यानं मंडळांकडून रोष व्यक्त होत आहे.