प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर आरोपींनी पीडित महिलेला रस्त्यावर फेकले.दरम्यान, या महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपीना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे हा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबधित गुन्हा गोंदिया पोलिसांकडे वर्ग केला आहे.


पीडित महिला हि पतिपासून वेगळी राहत असून गोंदिया जिल्हातील गोरेगाव येथे बहिणीकडे राहत होती. दरम्यान 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानंतर तिने रात्रीच्या सुमारास घर सोडले. ती भंडारा जिल्ह्यात आईकडे जाण्यासाठी निघाली असता संशयित आरोपीने तिला घरी सोडन्याच्या बहान्याने कार मध्ये बसवले.


त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला पाशवी अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी 31 जुलैला पळसगांव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. 


दरम्यान पीडिता जंगलातून निघून लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावाजवळ असलेल्या धर्मा ढाब्यावर पोहचली. त्यानंतर तिथे तिची दुचाकी दुरुस्त करणाऱ्या दुसऱ्या आरोपीसोबत भेट झाली. त्यानेही घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या मित्रासोबत 1 ऑगस्ट रोजी महिलेवर अत्याचार केला. 


अत्याचारानंतर कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सकाळी आठच्या दरम्यान निर्वस्त्र सोडून आरोपींनी पळ काढला. परिसरातील नागरिकांना हे पाहताच पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी केली असता महिलेवर अत्याचार झाल्याचे समोर आला आहे.


दरम्यान, महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात केल्यानंतर पुढील उपचाराकरिता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात हलवले आहे. पीडितेच्या सागितल्यांनुसार भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन संशयित आरोपीना अटक केली असून आरोपी विरुद्ध कलम 376 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी  संपूर्ण गुन्हात 3 संशयित आरोपीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे.  एका अज्ञात फरार आरोपीचा शोध गोंदिया पोलिस घेत आहे.