अलिबाग पर्यटन महोत्सवाला शनिवारी सुरूवात
अलिबाग नगरपालिकेच्या पर्यटन महोत्सवाला शनिवारी संध्याकाळपासून सुरूवात झाली. चार दिवस हा महोत्सव चालणार आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांना इथे चांगला वेळ घालवता येणार आहे.
अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या पर्यटन महोत्सवाला शनिवारी संध्याकाळपासून सुरूवात झाली. चार दिवस हा महोत्सव चालणार आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांना इथे चांगला वेळ घालवता येणार आहे.
महिला बचत गटांचे स्टॉल्स
पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाचे ध्येय डोळयासमोर ठेवून जवळपास १५० महिला बचतगटांना इथे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मांसाहारी जेवणाची मेजवानी
पर्यटकांना स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांबरोबरच कोकणी पदधतीच्या मांसाहारी जेवणाची लज्जत चाखण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन झाले.