गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील धन्नूरमध्ये शुक्रवारी रात्री वीज कोसळून चौघांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत ७ ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व जखमींना नजीकच्या आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृत आणि जखमींमध्ये पुरुषांचाच समावेश आहे. धन्नूर शामराव मुन्नी कन्नाके यांचाकडे जय पेरसापेन हा आदिवासी धार्मिक सोहळा सुरू होता.


कार्यक्रमासाठी धन्नूर आणि धन्नूर टोला या गावाच्या ग्रामस्थांना निमंत्रित करण्यात आलं होतं सोहळा आणि भोजन आटोपल्यावर ग्रामस्थ आपल्या गावाकडे परतत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. ग्रामस्थांनी शेतशिवारातील झाडाखाली आश्रय घेतला मात्र येथेच घात झाला. 


याच झाडावर वीज कोसळून घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ७ ग्रामस्थ गंभीर जखमी आहेत. कार्यक्रमाचे आयोजक शामराव मुन्नी कन्नाके हे पोलीस दलात कार्यरत असून घटनेत त्यांचाही मृत्यू झाला आहे.