मुंबई : उल्हासनगरात इमारतीचा काही भाग कोसळल्याने आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगर कॅम्प 1 मधील मोहिनी पॅलेस इमारतीचा काही भाग कोसळला आहे. पहिल्या मजल्यावर काही लोकं अडकले होते त्यांना फायर ब्रिगेडने सुखरुप बाहेर काढले आहे. आतापर्यंत 17 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणखी एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीडीआरफ, उल्हासनगर अग्निशमन दलाचे मदतकार्य सुरू आहे. हरिश डोडवाल, सावित्री पारचे 75, मिलिंद पारचे 12, संध्या डोडवाल 44 यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.



मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.