मुंबई : महाराष्ट्रात विशेषत: मान्सूनच्या काळात अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. यासाठी सरकारतर्फे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या वारसाला ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या महसूल, मदत व पुनर्वसन विभागातर्फे ही माहीती देण्यात आली आहे. यामध्ये वारसाला मिळणाऱ्या नोकरीविषयी काही माहीती उपलब्ध नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‌विजेमुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक अंपगत्व आलेल्या व्यक्तीस दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्त‌ीच्या निकटच्या नातेवाईकास आता चार लाखांची रक्कम मिळणार आहे. 


अशी मिळेल नुकसान भरपाई 


वीज पडून ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार
१०० तर ६० टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत 
वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला एका आठवड्यापेक्षा जादा काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यास १२ हजार ७०० रु.
एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ४ हजार ३०० रुपये इतकी मदत मिळणार आहे,