Pune News Today: पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात दरोड टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीच हा प्रताप केल्याचे उघड झाले आहे. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे असे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात गुन्ह्यात जप्त केलेल्या दुचाकी परस्पर विकल्याचं समोर आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्माच्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितल्या अशी धक्कादायक कबुली दिली. तसचं या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचाऱ्यांनी या आरोपीला त्या दुचाकी परस्पर बाजारात विकण्यास सांगितले.


स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्यांनी टाळाटाळ केली तसंच चौकशीसाठीही उपस्थित राहिली नाही. परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सोमवारी या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली. 


पुणे पोलिसा मार्फत मुद्देमालातील दुचाकी भंगारवाल्याला विकणाऱ्या पुण्याच्या लोणीकाळभोर पोलिस स्थानकातील ४ पोलिसाना तातजीने निलंबन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्तांनी तडकाफडकी या पोलिस कर्मचाऱ्यांचा निलंबनाचा आदेश काढला आहे. तर, या घटनेमुळं पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.