देशातील सर्वात पहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी
भारतातील सर्वात पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबई : भारतासाठी अभिमानाने उंचावणारी घटना घडली आहे. पुण्यात पहिल्यांदाच कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. चार वर्षाच्या या चिमुकलीच्या कवटीचा जवळपास 60 टक्के भाग प्रत्यारोपण करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आलं आहे.
गेल्यावर्षी 31 मे रोजी शिरवाल येथे झालेल्या अपघातात या मुलीला प्रचंड दुखापत झाली होती. आणि या मुलीच्या कवटीला खूप मार बसला होता. या अपघातानंतर मुलीवर 2 सर्जरी झाल्या आणि त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आलं. मात्र यावर्षी पुन्हा तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आणि आता तिच्या कवटीच्या यशस्वीरित्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्वप्रथम तिच्या मेंदुला धक्का पोहोचणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. काही न्यूरोसर्जन्सनी तिच्या मेंदूजवळची जखमी हाडं अलगदपणे काढून टाकली. ही हाडं काढताना तिला कुठेही जखम होऊ दिली नाही. यामुळे मेंदूला इजा होण्याचा धोका टळला. पण डोक्यासाठी नवीन कवटी बसवणं गरजेचं होतं. त्यामुळे अमेरिकेतून खास एक कृत्रिम कवटी मागवण्यात आली.
दोन ते तीन किचकट शस्त्रक्रिया करून ही कवटी तिच्या डोक्यात बसवण्यात आली. या सगळ्यात दीड वर्षाचा काळ गेला. पण आता त्या चिमुकलीचं आयुष्य पुर्ववत झालं आहे. मुलीच्या आईने सांगितलं की, भारती रूग्णालयातील डॉ जितेंद्र ओसवाली यांनी स्कल ट्रान्सप्लान्ट यशस्वीरित्या केली आहे.