मुंबई: राज्यभरात अवयव दान जनजागृती करण्यासाठी मोठी मोहिम सुरु झालेली पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही यात हिरीरीने भाग घेत आहेत. सरकारी रुग्णालय, खाजगी संस्था याबद्दल जागृती करताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रालयातील ४०० जणांनी अवयवदान संकल्प अर्ज भरून दिले. यातून एक चांगले सकारात्मक उदाहरण समाजासमोर गेले आहे. या अवयव दानाच्या संकल्प अर्जात ६५ टक्के अर्ज ४५ वर्षांखालील वयोगटातील व्यक्तींचे आहेत. यासह कुटुंबातील व्यक्तींकडूनही अर्ज भरून घेण्यासाठी प्रत्येकाने तीन ते चार अर्ज घरी नेले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या आकड्यात अजूनही वाढ होणार आहे.
या केंद्रावर वरिष्ठ अधिकारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली. यात गृह विभागाचा सहभाग अधिक आहे. पोलिस उपायुक्त ते पोलिस शिपाई अशा सर्व श्रेणींतील कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला.


कोणी घेतला पुढाकार ?


मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात अवयवदान जनजागृतीविषयक पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यासोबतच अवयवदान नोंदणी केंद्रही उभारण्यात आले होते. या केंद्राचे व्यवस्थापन ‘जीवन विद्या मिशनच्या झोनल ट्रान्सप्लॉण्ट कॉर्डिनेशन सेंटर’द्वारे करण्यात आले.