Chandrapur News :  41 पोलीस जवानांना  पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्ययात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  सर्व पोलिस चंद्रपूर जिल्हा पोलिस मुख्यालयात नियुक्त आहेत.  पोलीस कॅन्टीन मध्ये मांसाहार केल्यानंतर उलटी व मळमळ वाटू लागल्याने सर्वाना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर जिल्हा पोलिस मुख्यालयात नियुक्तीला असलेल्या 41 पोलीस जवानांना जेवणातून विषबाधा झाली आहे.  पोलीस कॅन्टीन मध्ये मांसाहार केल्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्यांना उलटी आणि मळमळ होऊ लागली. सर्वांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 38 पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारानंतर घरी  सोडण्यात आले. तर, तीन कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. यासंदर्भात चौकशी केली जात आहे.  


बीड जिल्ह्यातील भगर सेवन केल्याने 550 भाविकांना विषबाधा


भागवत एकादशी आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी असलेल्या महाशिवरात्रीमुळे लातूर परभणी बीड जिल्ह्यातील भगर सेवन केल्याने साडेपाचशे भाविकांना विषबाधा झाली होती. लातूर परभणी बीड जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. सांगोली येथे नवोदय विद्यालयाच्या दीडशे विद्यार्थ्यांना उलटी, अतिसार तसेच पोटदुखीचा त्रास झाला. 


महाशिवरात्री ला उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली होती.  एका खासगी कंपनी चे भाजणी पीठ खाल्याने अनेकांना उलटी,मळमळ आणि चक्करचा त्रास झाला. अन्न व औषध विभागाने या घटनेची दखल घेतली असून कंपनीच्या मनुफॅक्चरिंग युनिट मधील खाद्य पदार्थांच्या कच्या मालाचे नमुने तपासण्यात आले.