मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत चाललं आहे. मृतांची संख्या रोज वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात कोरोनाचे २४३६ रुग्ण वाढले आहेत. आज लागोपाठ तिसऱ्या दिवशी राज्यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात मृत्यूचं प्रमाण वाढताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत ८०,२२९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ३५,१५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २८४९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


५ जून रोजी राज्यात कोरोनाचे २४३६ रुग्ण वाढले होते तर १३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
४ जून रोजी राज्यात कोरोनाचे २९३३ रुग्ण वाढले होते तर १२३ जणांचा मृत्यू झाला होता.
३ जून रोजी राज्यात कोरोनाचे २५६० रुग्ण वाढले होते तर १२२ जणांचा मृत्यू झाला होता.
२ जून रोजी राज्यात कोरोनाचे २२८७ रुग्ण वाढले होते तर १०३ जणांचा मृत्यू झाला होता.



देशात एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात मुंबई कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहे. मुंबई सारख्या वर्दळीच्या शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सरकार आता कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना आखतात हे पाहावं लागणार आहे.