गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : जगभरात स्त्रीचा सन्मान होत असताना परभणीत मात्र 5 दिवसाच्या अर्भकाला स्त्री जन्म म्हणून फेकून दिल्याची संतप्त घटना समोर आली आहे. सेलू तालुक्यातील गूळखंड फाटा येथे हा संतापजनक प्रकार समोर आला. वयोवृद्ध सीताबाई राऊत यांच्या जनावरांच्या गोठ्यात फडक्यात गुंडाळून हे बाळ फेकून देण्यात आले होते. कुत्र्यांच्या तावडीतून सीताबाई यांनी या बाळाचा जीव वाचवत पोलिसांच्या मदतीने रुग्णालय गाठले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रियांच्या कार्यकर्तुत्वाचे सोहळे साजरे होत आहेत. परभणीत मात्र निर्दयी माता पित्यांनी 5 ते 6 दिवसाच्या नवजात अर्भकाला फेकून दिल्याची संतप्त घटना समोर आली आहे. बोरी पोलिस ठाणे हद्दीतील गूळखंड फाटा येथील सीताबाई राऊत यांच्या जनावरांच्या पडक्या गोठ्यात या नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला फेकून देण्यात आले होते.



काल रात्री साडे नऊच्या सुमारास 70 वर्षीय सीताबाई यांनी कुत्र्यांच्या भांडनांचा आवाज ऐकून गोठ्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांना फडक्यात गुंडाळून जमिनीवर टाकून दिलेल बाळ दिसलं. हडबडलेल्या सीताबाईंनी तीला घरी नेऊन गाईच दूध पाजल,सकाळी ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने तीला परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल ही केलय. बाळाची प्रकुर्ती चांगली सळी तरी बाळाला आयसियू मध्ये उपचार देण्यात येत आहेत.
 
चाइल्ड लाइन आणि पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेत बाळाला रुग्णालयात दाखल केले. नकोशीला फेकून देणारे निर्दयी पालक कोण आहेत ? याचा कसून तपास बोरी पोलिसांनी सुरू केला आहे. या गोंडस परीचे निर्दयी माता पिता कोण ? हे ओळखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बाळावर उपचार करून तिला बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.


ठिकठिकाणी स्त्री जन्माचे सोहळे साजरे होत असतांना काही अश्या दुर्दैवी घटना ही घडत आहेत. पण ज्या माऊलीने कुत्र्यांच्या तावडीतून या लेकीला वाचवले त्या वृद्ध सीताबाईं ही खूप थोर आहेत. सीताबाई यांना एक मूल लहान असतानाचं मृत पावले. त्यानंतर काही महिन्यातच पतीचा ही मृत्यू झाला. निराधार असलेल्या सीताबाईंनी शेजारी राहत असलेल्या बानु पठाण आणि हबिब पठाण या दांपत्याच्या मृत्यूपश्चात त्यांच्या चार चिमुकल्याचा कुठल्याही अपेक्षेविना सांभाळ केला.  


सीताबाई अशिक्षित असूनही त्यांनी जाती पातीच्या भिंती तोडून चार मुस्लिम अपत्यांचा आयुष्यभर सांभाळ केला. त्यांना त्यांच्याच धर्माची शिकवण ही दिली. वाढवलं मोठ केलं आणि त्यांना पंख फुटल्यावर आपल्या वृद्ध पणाच त्यांच्यावर ओझ पडू नये म्हणून त्यांना आपल्यापासून दूरही केल. अशी थोर माऊली  नकोशीला उचलून ह्रदयाला लावणार नाही तर मग नवलच.. जनसामण्यातल्या असामान्य सीताबाई राऊत यांना त्यांच्या या उत्तूंग योगदानाबद्दल जागतिक महिला दिनी 'झी 24 तास'चा सलाम....