पुणे : सीरम इन्स्टीट्यूटमध्ये ईमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. 6 व्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटमध्ये ही आग लागली होती. पण अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीत आग लागल्याने मोठी हानी टळली आहे. या आगीतून ६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.



या आगीत कोरोना लसीच्या प्रोडक्शनचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. अशी माहिती संस्थेचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे.



पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.