Thane Lift Accident : ठाण्यात एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली आहे. या दुर्घटनेत सहा जण जागीच ठार झाले आहेत. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नेमकी दुर्घटना कशी घडली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस आणि  अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.


नेमकं काय घडलं?


ठाण्याच्या बाळकुम परिसरात दुर्घटना घडलेय. बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंग चे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.दोन जण जखमी आहेत