पुणे : कारमध्ये गुदमरून एका ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ वर्षांच्या एक मुलगा कारमध्ये खेळत होता. तेव्हाच खेळता खेळता कार लॉक झाली. सुमारे ५ तास कार बंद राहिल्यानंतर या मुलाचा मृत्यू झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, करण दुपारी आपल्या मित्रांसोबत खेळत होता. खूप गरम होत असल्याने तो जवळच्या एका उभ्या असलेल्या कारमध्ये बसला. कार अचानक बंद झाल्याने तो बाहेर पडू शकला नाही. त्यानंतर पाच तासांनी तो कारमध्ये मृत अवस्थेत आढळला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर जळल्याने येणाऱ्या जखमा होत्या. दिवसाच्या अधिक तापमानामुळे कार गरम झाली आणि त्याचे चटके त्या निष्पाप बाळाला बसले.



दिल्लीत घटली अशी घटना


अशीच घटना दिल्लीत ऑक्टोबर महिन्यात घडली होती. कारमध्ये दोन मुले खेळत होती. कार घरासमोरच उभी होती. ही कार या दोन मुलांपैकी एकाच्या वडीलांचीच होती. गाडीत कोणीच नाही असे वाटल्याने दुपारी एकच्या सुमारास कार मालकाने कार लॉक केली. मुले खूप वेळापासून गायब असल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्याचदरम्यान मुले कारमध्ये बंद असल्याचे एका नातेवाईकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर मुलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तेथे नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. गुदमरून दोन निष्पापांना आपला जीव गमवावा लागला.