नागपूर : उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने एसी, कूलरचा वापर घराघरात केला जातो. मात्र या उपरकरणांची योग्य ती देखभाल केली नाही तर ती जीवघेणी ठरु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक घटना नागपुरात घडलीये. घरातील कुलरचा शॉक लागल्याने ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरच्या स्वागतनगर परिसरात घडलीये.


खुशी असं या चिमुरडीचं नाव आहे. खुशी फ्रीजमधून पाण्याची बाटली काढत असताना कुलरशी तिचा संपर्क आला. यावेळी कुलरचा शॉक लागल्याने त्यात चिमुरडीचा मृत्यू झाला. चिमुरडीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.