औरंगाबाद : सिल्लोड येथे बुधवारी 50 वर्षीय महिलेवर घरात घुसून रॉकेल टाकून पेटवण्यात आलं. या घटनेत महिला 95 टक्के भाजली होती. या महिलेची अखेर मृत्यूशी झुंज ही अपयशी ठरली आहे. घाटी रूग्णालयात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरकोळ घरगुती वादातून हे जळीतकांड घडल्याचं समोर आलं आहे. बिअर बार चालकाने महिलेवर घरात घुसून रॉकेल टाकले. यामध्ये महिला 95 टक्के भाजली होती. या महिलेचा आता मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बिअर बार चालक संतोष मोहितेला अटक केलं आहे. (धक्कादायक, महिलेला घरात घुसून जिवंत जाळले, आधी वाटले आत्महत्या केली पण...) 


या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरणत तापलं आहे. महिलेचे बिअर बार चालकाशी अनैतिक संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याविरोधात महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच या घटनेनंतर मुंबईतील दहिसर परिसरात देखील एका 26 वर्षीय तरूणीला देखील जाळण्यात आलं. यावरून महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा सवाल विचारण्यात येत आहे. 


हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला सोमवारी जाळण्यात आले होते. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे रविवारी ही घटना घडली. पण सुरुवातीला तिनेच आत्महत्या केल्याचे सगळ्यांना वाटत होते. मात्र, दोन दिवसांनी ही महिला शुद्धीवर आली, त्यावेळी तिच्या जबाबात हा धक्कादायक प्रकार उघड झाला. महाराष्ट्रात २४ तासांत दोन सावित्रीच्या लेकी पेटवून दिल्याची घटना पुढे आल्यानंतर संपात आणि चिड व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोड शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे.