कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. आज कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे तब्बल ५०० रुग्ण वाढले आहेत. मधल्या काळात कोरोना रुग्णांची रोज वाढ संख्या कमी झाली होती. पण पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवलीत ४८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण-डोंबिवली भागात कोरोना संक्रमितांना आकडा दरररोज वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात येथे ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आज वाढलेल्या रुग्णांमध्ये कल्याणमध्ये १७९, डोंबिवलीत-२९५, तर टिटवाळ्यात २६ रुग्ण वाढले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांचा आकडा आता ३५,७३५ वर पोहोचला आहे. तर अजूनही ५२७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २९७२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत कोरोनामुळे ७३४ जणांचा मृत्यू झाला आहे.