नागपूर : एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु असताना नागपुरात मात्र गुंडाच्या सेलिब्रेशनवर नागपूर पोलिसांनी पाणी फेरलं आहे. कारण या सेलिब्रेशनच्या आधीच सुमारे 500 गुंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे तुरुंगातच आता गुंडांचं नवीन वर्ष उजडणार आहे. या कारवाईचं नागरिकांकडून ही स्वागत होत आहे. वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस हे गुंडं २४ तास तुरुंगातच राहणार आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री अनेक ठिकाणी दारु पिऊन धिंगाणा घातला जातो. ज्यामध्ये असे गुंड हे अग्रेसर असतात. त्यामुळेच पोलिसांनी यांना आधीच तुरुंगात बंद केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान सर्वसामान्यांना काही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी ही विशेष काळजी घेतली आहे. यासाठी जवळपास ४ हजारांहून अधिक पोलीस तैनात आहेत. गोंधळ घालणाऱ्यांना ही पोलिसांनी इशारा दिला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री अनेक ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटना घडतात. गेल्या अनेक दिवसात नागपुरात क्राईमच्या घटना ही वाढल्या आहेत. त्याला देखील आळा घालण्याचं आव्हान नागपूर पोलिसांपुढे असणार आहे.


नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. पण या दरम्यान पोलिसांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.