मुंबई : २०१६ सालातल्या अपघातांची आकडेवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी एकूण ४ लाख ८० हजार ६५२ अपघात नोंदवले गेले आहेत. यामध्ये १ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दर तासाला ५५ अपघात होतात तर दर तासाला १७ जणांचा मृत्यू होतो असं या आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे.


२०१५ च्या तुलनेत रस्ते अपघातांचं प्रमाण ४.१ टक्क्यांनी कमी झाल्याचंही या आकडेवारीवरून स्पष्ट होतं आहे. मात्र अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मात्र ३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातल्या एकूण अपघातांपैकी ८६ टक्के अपघात हे केवळ १३ राज्यांमध्ये झालेत. या १३ टक्क्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.